
“तृतीयपंथी कडून माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून कार्य”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, सोलापूर
दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे भव्य वार्षिक अधिवेशन २०२५ शिवछत्रपती रंगभवन सभागृहात सोलापूर येथे संपन्न झाला.
या अधिवेशनाचे प्रमुख अतिथी श्री. जितेंद्र भावे सर संस्थापक अध्यक्ष निर्भया महाराष्ट्र पार्टी, तसेच श्री. सुभाष बसवेकर सर संस्थापक अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन हे उपस्थित होते.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर यांनी या अधिवेशन आयोजित केले होते. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर विशेष बाब म्हणजे सोलापूर येथे तृतीयपंथी हे सुद्धा सध्या रस्त्यावर येऊन सामाजिक कार्याची जडणघडण करीत असताना पाहायला मिळाले.
माहिती अधिकार फेडरेशन महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष नर्सिंग बिल्ला उर्फ माताजी यांच्यासोबत अनेक तृतीयपंथी सुध्दा माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सोलापूर मध्ये एक वर्षापासून काम करीत आहेत.
माहिती अधिकारी फेडरेशन सोलापूर जिल्हाध्यक्ष नर्सिंग बिल्ला उर्फ माताजी यांच्या सोबत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई चे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी बातचीत केली.





