
“लहान भावाने मोठ्या भावाला शेतातच संपवले”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, यवतमाळ
ही घटना महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथील शेतात मंगळवार, २६ ऑगस्ट राेजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. मंगळवारी सकाळी प्रदीप मुगाच्या शेंगा तोडत असताना त्या ठिकाणी माेठा भाऊ निलेश त्यांच्या चार वर्षाच्या मुलीला घेवून आला. नीलेशने शेंगा तोडणाऱ्या प्रदीपला मनाई केली.
यामुळे संतापलेल्या प्रदीपने काठीने नीलेशच्या ताेंडावर, डाेक्यावर हल्ला केला. यात निलेश गंभीर जखमी हाेऊन जागीच ठार झाला. यावेळी नीलेशची मुलगी रेणू तेथेच उपस्थित हाेती. वडिलांना रक्ताच्या थाराेळ्यात पाहून रेणूने थेट घराकडे धाव घेतली. घटनेनंतर आराेपी प्रदीप हा शेतातील झाडाखाली बसून हाेता. चार वर्षाच्या रेणूने वडिलांसाेबत झालेल्या घटनेचा थरार आईला सांगितला. त्यानंतर याची माहिती गावकऱ्यांनी महागाव पाेलिसांना दिली.
ठाणेदार धनराज नीळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पाेलिस बघताच आराेपी प्रदीपने तेथून पळ काढला. महागाव पाेलिस व एलसीबी पथकाने पाठलाग करून आराेपी प्रदीपला ताब्यात घेतले. ही कारवाई सहायक पाेलिस निरीक्षक धीरज बांडे, संतोष बेरगे, मुन्ना आडे, तेजाब रणखांब, रमेश राठोड, कुणाल मुंडकर, सुभाष यादव, सुनील पंडागळे यांनी केली. उमरखेडचे एसडीपीओ हनुमंतराव गायकवाड यांनी घटणास्थळी भेट दिली.
चिमुकली रेणू घटनेची प्रत्यक्षदर्शी
काकानेच वडिलांचा काठीने मारून खून केला, या घटनेची चिमुकली रेणू प्रत्यक्ष दर्शी आहे. तिने हे आईला सांगितल्यानंतर खुनाची घटना गावकऱ्यांना माहिती झाली. पाेलिसांनी आराेपी प्रदीप रिंगे याला दाेराने बांधुन पाेलिस ठाण्यात नेले. मयत नीलेश याच्या मागे गराेदर पत्नी, वडील आणि चार वर्षांची मुलगी रेणू असा परिवार आहे. घटनेने गावात हळहळ व्यक्त हाेत आहे.