
“वासुदेव सुखदेव मस्के यांचा पालकमंत्री हस्ते सत्कार”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, वाशिम
भारताचे पंतप्रधानांनी २०१९ मध्ये जल जीवन मिशनची घोषणा केली होती. त्याअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळजोडणी देत स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल, असे केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केले होते.
त्यावेळी मंत्रालयाने सांगितले होते की, देशातील १७.८७ कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी सुमारे १४.६ कोटी (८१.६७%) कुटुंबांकडे घरगुती नळजोडणी नव्हती. त्यासाठी एकूण ३.६० लाख कोटीं रुपयांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामध्ये २.०८ लाख कोटी रुपये एवढा केंद्राचा वाटा होता; तर १.५२ लाख कोटी एवढा राज्यांचा वाटा होता. या संदर्भातील निधीवाटप हे हिमालयीन आणि ईशान्येकडील राज्यांसाठी ९०-१० आणि इतर राज्यांसाठी ५०-५० असे निश्चित करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा दररोज करणे हे या जल जीवन अभियानाचे प्रमुख्य उद्दिष्ट आहे.
जलतारा ही योजना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राबविण्यात येते. जामदरा घोटी तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथील आदर्श व्यक्तिमत्व असणारे शेतकरी वासुदेव सुखदेव मस्के यांनी शासकीय योजनेचा कोणताही निधी न घेता स्वतः जवळून ५० हजार रुपये खर्च करून त्यांच्या परिसरात राबविली ही योजना चांगल्या प्रकारे राबविल्याबाबत शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तामामा भरणे तसेच वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी भुनेश्वरी मॅडम यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी वासुदेवराव मस्के यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यामुळे त्यांचे परीसरातील नागरीकांन कडून कौतुक केले जात आहे.