
“खा.संजय देशमुख यांची दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात आकस्मिक भेट”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, यवतमाळ
काही दिवसांपूर्वी दारव्हा येथे चार लहान मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळी नागरिकांनी फोन करून मदत मागवूनही कोणत्याही प्रकारची ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध झाली नाही ही बाब अत्यंत धक्कादायक आहे.
या पार्श्वभूमीवर मृत मुलांच्या घरी खासंजय देशमुख यांनी भेट देऊन सांत्वन केल्यानंतर ही माहिती दिली आणि या आगोदर ही उपजिल्हा रुग्णालयातूनही फोन द्वारे व लेखीस्वरूपात खूप मोठ्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याच अनुषंगाने खा.संजय देशमुख यांनी अचानक दारव्हा उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली असता अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.
रुग्णालयात संबंधित अधिकारी ड्युटीवर असूनही हजर नव्हते, रुग्णांची मोठी हालअपेष्टा होत होती. रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा अभाव स्पष्टपणे दिसत होता, तसेच रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या.
खा.संजय देशमुख यांनी यावेळी उपस्थित डॉक्टरांना समोर घेऊन थेट विचारपूस केली. रुग्णालयात कोणत्या सुविधा उपलब्ध नाहीत याची संपूर्ण माहिती मला द्यावी, अशी सूचना दिली.
तसेच या सुविधांच्या पूर्ततेसाठी मी माझ्या स्तरावरून संबंधित डिपिटीसी मध्ये विभागाशी पाठपुरावा करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
भेटीदरम्यान रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व प्रशासनाला तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.