
“मानोरा तालुक्यात हुमणी अळीचा कहर”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
मानोरा तालुक्यातील मौजे आसोला खुर्द येथील शेत सर्व्हे नंबर १०४ मधील १ हेक्टर २६ आर मधील सोयाबीन पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने महागडे कीटकनाशक फवारणी करूनही शेत जमीन रिकामी झाली आहे.
त्यामुळे पिकांची पाहणी व पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी असे निवेदन दि. २६ ऑगस्ट रोजी तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी बाधीत शेतकरी वसंत राठोड यांनी दिले आहे.
निवेदनानुसार मौजे आसोला खुर्द शेत शिवारातील गट नं १०४ मधील ३ एकर शेतात यावर्षी खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी केली होती. शेतात सोयाबीन पीक जोमात असताना अचानक जमिनीतून उगम झालेल्या हुमणी अळीने जमीन पोखरून पिकांच्या मुळावर हल्ला चढविला. प्रथमता हुमनी अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच शेतकऱ्याने युरिया खतामध्ये कृषी विभागाने सुचविलेल्या महागडे कीटकनाशकाची फवारणी केली.
परंतु त्याचा काहीही परिणाम न झाल्याने साधस्थितीत संपूर्ण शेती रिकामी दिसत आहे. हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने जमीन पडीत पडली असुन एक लक्ष २५ हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी व पंचनामा करण्याची मागणी बाधीत शेतकरी वसंत राठोड यांनी महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
*आता कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकरीवर्ग*
उन्हाळ्यात शेणखत शेतात टाकून ३ एकर शेतात मोठ्या उत्साहाने उत्पादन अधिक घेण्यासाठी सोयाबीनची पेरणी केली. परंतु हुमणी अळी किडींच्या प्रादुर्भावाने त्यावर पाणी फेरले असुन आता कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत जीवन जगत आहे.