
“बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तान्हापोळ्याचे आयोजन”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
कामरगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तान्हापोळ्याचे औचित्य साधून विविध भागांमध्ये मुलं उत्साहाने तान्हा पोळा साजरा केला.
कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालय येथे बैला प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बैल सजावट स्पर्धा तसेच शेतकरी,बैल व शेती या संदर्भात कविता गायन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय मुख्यमंत्री कृष्णाली तुमसरे तथा उपमुख्यमंत्री सिद्धार्थ इंगळे व प्रमुख पाहुणे स्नेहल नागापुरे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना शेतकरी व बैल यांच्या अपार मेहनती बद्दल जाण निर्माण व्हावी व श्रमाचा सन्मान त्यांनी करावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयांमध्ये करण्यात आले होते मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात प्रमुख तथा गाईड युनिटचे प्रमुख दिपाली खोडके मॅडम यांनी काम पाहिले.
पर्यवेक्षक गोपाल खाडे, सतीश चव्हाण, शितल देशमुख, नीता तोडकर, चंद्रशेखर पिसे, भूमिका भाकरे, पुष्पा व्यवहारे, प्रमोद सांगळे, गजानन देशमुख, धनु गारवे कैलास वानखडे शिक्षकांनी वर्गांची तयारी करून घेतली होती.
वर्ग पाचवी ते आठवीच्या सर्व वर्गांनी सामूहिक कविता गायन केले. साक्षी गाढवे व मानवी लाडवीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रस्ताविक निशूका प्रघने तर आभार तेजस्विनी गाठे यांनी मानले.