
“पालकमंत्र्याच्या हस्ते उपजिल्हाधिकारी शिल्पा सोनाले यांचा सत्कार”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, नागपूर
महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभागात सन २०२४-२५ या महसूली वर्षात कार्यालयीन कामाकाजसह क्षेत्रीयस्तरावर उत्कृष्ठ कार्यकेल्याबद्दल उपजिल्हाधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांचा राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन १५ ऑगस्टला सन्मानित करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी, अति. विभागीय आयुक्त श्रीमती माधवी खोडे, उपायुक्त राजेश खवले, तेजुसिंग पवार, जिल्हाधिकारी बिपीन इटनकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीमती सोनाले यांना १० वर्षाच्या उपजिल्हाधिकारी या पदावरील कार्यकाळात चौथ्यांदा उत्कृष्ठ उपजिल्हाधिकारी हा सन्मान मिळालेला आहे.