
“शेतकऱ्याचा अपमान: जिल्हाधिकाऱ्यांकडून महिला अधिकाऱ्याची पाठराखण”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, वाशीम
वाशिम इथ शाश्वत शेती दिनाच्या कार्यक्रमात जेवणावरून वाशिम कृषी विभागातील आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे या महिला अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यावर अरेरावी करत शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावून घेतला होता.
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या घटनेने शेतकऱ्यांमध्ये संताप होता.आज कृषी मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे हे वाशिम जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांनी याविषयी प्रश्न केला असता जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी अरेरावी करणाऱ्या महिला अधिकाऱ्याची पाठराखण केली मात्र कृषिमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असल्यास कारवाई करू असे आश्वासन दिले.