
“सकाळपासून संध्याकाळपर्यंत चिमुरडीवर अत्याचार”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, अहिल्यानगर
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे.
तिसरीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच शिक्षकाने या चिमुकलीला दुपारच्या जेवणाच्या सुट्टी वेळी संजय फुंदे या नराधम शिक्षकाने वर्गात बोलावून घेतलं.त्यानंतर तिच्यावर त्याने तिथेच अत्याचार केले. झालेली घटना मुलीने घरी गेल्यानंतर आपल्या आईला सांगितली. त्यानंतर तिचे आई आणि वडील जाब विचारण्यासाठी शाळेत गेले होते.संबंधित कुटुंबीय हे परप्रांतीय असल्याने स्थानिकांकडून हे प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे.
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारी नुसार १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पीडित मुलीवर शाळेच्या परिसरातच जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संजय उत्तम फुंदे, आदिनाथ रामनाथ दराडे, राजेंद्र सूर्यभान दराडे, मुनवरखान पठाण, उमर नियाज पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती असून इतर चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.