♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“मृतक कर्मचारी रवि पवार यांच्या वारसाला ४५ लाखाचा धनादेश”

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 

 

ज्ञानेश्वर चव्हाण, वाशिम

 

मंगरुळपीर तालुयातील भगवंतराव महाकाळ विद्यालय, मानोली येथील कर्मचारी रवि बळीराम पवार यांचा ३ जानेवारी २०२५ रोजी अपघाती मृत्यू झाला होता.

 

रवि बळीराम पवार यांचे वेतन जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत होत असल्याने बँकेच्या वतीने रवी पवार यांचा अपघात विमा काढण्यात आला होता.

 

पवार यांच्या मृत्युची माहिती मिळताच अकोला – वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोला शाखा मंगरुळपीर शहरचे शाखाधिकारी यांनी पगारदार अपघात विमा मिळण्यासाठी पाठपुरावा केला.

 

बँकेच्या वतीने पगारदार अपघात विमा रकम ४५ लाख मंजूर करण्यात आली. विमा रकमेचा धनादेश अपघातातील मृतकाची पत्नी माधुरी रवि पवार यांना ४५ लाख रुपयाचा धनादेश बँकेचे संचालक सुभाष ठाकरे यांच्या शुभ हस्ते देण्यात आला.

 

यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांच्या उपस्थितीत होते. सोबत संतोष महाकाळ, मुख्याध्यापक पुनम अढाव प्रल्हाद शिंदे, विजय शेळके, तसेच विद्यालयाचे शिक्षक महादेव घुगे, अभिजीत नानोटे, बलदेव राठोड, विशाल काटेकर, भारत धनमोल, शहर शाखा शाखाधिकारी निकेता खडसे, स्वप्निल देशमुख, बालाजी राठोड, व इतर लोक उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129