
“हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसात मुसळधार पाऊस, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
योगेश जाधव, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसात मुसळधार पाऊस झाल्याने सेनगाव तालुक्यातील कयाधू नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. त्यामुळे नदीकाठील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्यामध्ये हळद, सोयाबीन, कापूस, तुर, मुग, उडीद या पिकांचा समावेश आहे.
सदर नुकसानीचा प्रशासनाकडून सर्वे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी बांधवांमधून जोर धरत आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महादेव हरण यांनी.