
“संत बाबनाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त महाप्रसादाचे वितरण”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीपकुमार चव्हाण, वाशिम
बंजारा समाजाची काशी पोहरा (देवी) या ठिकाणी बंजारा समाजात महान संत दानशूर बाबनाजी महाराज हे इसवी सन १९२२ मध्ये होऊन गेले. दिनांक १८ सप्टेंबरला दरवर्षी त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते.
आज दानशूर संत बाबनाजी महाराज यांची १०३ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे. येथे रात्रीपासून बंजारा समाजाचे भजन चालू होते. सकाळी बंजारा समाजाचे धर्मगुरू संत बाबू सिंग महाराज विधान परिषद सदस्य यांच्या हस्ते संत बाबानाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून भोग लावण्यात आला आणि बंजारा समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद आणि त्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.





