
“शक्तीपीठ महामार्ग औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राला जोडण्यात यावा अशी मागणी”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
यश जाधव, हिंगोली
महराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा एम एस आर डी सी अध्यक्ष मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब आजच्या कावड यात्रेनिमित्त हिंगोली येथे उपस्थित झाले असता हिंगोली करांच्या वतीने मा. उपमुख्यमंत्री यांचे हेलिपॅड वर जंगी स्वागत करण्यात आले. तेव्हा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राला जोडण्यात यावा अशी हिंगोली परीसरातील जनतेची मागणी होती .
या विषयी कालपासून बी बी राठोड लेखाधिकारी साहेब तसेच संतोष भाऊ राठोड येडशीकर यांच्यासोबत सतत या विषयावरच दूरध्वनीवरून बोलणे चालू होते. जनतेला पुर्ण विश्वास होता की संतोष भाऊ राठोड मा.ना.शिंदे साहेबांना हिंगोली करांचे मागण्याचे निवेदन देऊन आपले कार्य चांगल्या प्रकारे पार पाडतील असा विश्वास आज त्यांनी पुर्ण केला. मा.ना. एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री साहेबांना कळमनुरी मतदारसंघाचे लाडके आमदार संतोष रावजी बांगर साहेब यांच्या सहकार्याने तसेच ॲड. पंजाबराव चव्हाण यांचे भाचे संदीप भाऊ राठोड यांना सोबत घेऊन हिंगोली करांच्या मागण्याचे निवेदन उपमुख्यमंत्री यांना दिले. संतोष भाऊ राठोड येडशीकर यांचे ग्रुपच्या माध्यमातून आभार मानन्यात आले.