
“यवतमाळ शहरात सर्पमित्रांची रॅली”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, यवतमाळ
एम एच २९ हेल्पिंग हँन्डस वाईल्ड ॲडव्हेंचर क्लब यवतमाळ तर्फे यवतमाळ शहरात एक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सापांन विषयी जनगजागृती व्हावी म्हणून सर्पमित्रांनी सापान बाबत लाऊड स्पीकर लावून माहिती देण्यात आली. विषारी साप कोणकोणते असतात त्यांचे नाव व जाती यांची माहिती एका परिपत्रकाद्वारे देण्यात आली.
भारतीय नाग कोब्रा यांची लांबी तीन ते सहा फुटापर्यंत असते. याचा रंग गव्हाळी उपकिरी काळा राखाडी रंगात आढळतो त्याच्या फणामागे फणा उभारल्यानंतर मोडी लिपीत दहाचा आकडा दिसतो.
फुरसे हा सुद्धा विषारी साप आहे. याची लांबी एक ते तीन फुटापर्यंत असते याचे डोके त्रिकोणी मोठे सोनेरी डोळे हा दिवसा व रात्री आढळतो.
मन्यार हा सुद्धा विषारी साप याची लांबी दोन ते चार फूट निशाचर व लाजाळू काळसर, निळा किंवा गदड जांभळा त्यावर आडव्या पांढऱ्या पट्टया डोक्यावर फिक्कट तर शेपटी गडद असते.
परड याला घोणस सुद्धा म्हणतात. याची लांबी तीन ते साडेपाच फुटापर्यंत असते. अशाप्रकारे क्लब द्वारे जनजागृती रॅलीतून सापांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
या क्लबचे संस्थापक अध्यक्ष निलेश मेश्राम मो. नं. 9850577616 असुन उपाध्यक्ष प्रज्वल तूरकाने मो. नं. 9850155437 असा असून जनतेनी आवश्यक वेळी सर्पमित्रांची मदत घ्यावी असे आवाहन केले आहे.