
“युवा चेहऱ्यांना काँग्रेस प्रदेश कार्यकारणीत संधी”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, यवतमाळ
काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी दोन दिवसापूर्वी जाहीर झाली असून या कार्यकारणीत युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये आर्णी येथील नगरपालिकेचे माझी उपनगराध्यक्ष आरीच बेग मिर्झा, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष माधुरी आडे (यांची प्रदेश सचिव पदी), समीना शेख (यांची सचिवपदी), उमरखेड मधून किसनराव कांबळे (यांची प्रदेश सरचिटणीस पदी), नेर मधून प्राध्यापक संजय वानखडे (यांची सचिव पदी) यांची वर्णी लागली आहे.
प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या यादीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने मंजुरी दिली आहे. प्रदेश कार्यकारणीत यावेळी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.