♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“एका ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन प्रेम 9 कोटींत पडलं”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

दिलीप चव्हाण, मुंबई 

 

मुंबईतील एका 80 व्या वर्षी ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन प्रेम चांगलेच महागात पडले. प्रेम आणि खोट्या सहानभूतीच्या नावाखाली या ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी तब्बल 9 कोटी रुपयांनी गंडवले.

 

एप्रिल 2023 मध्ये त्या वृद्ध माणसाने फेसबुकवर ‘शावी’ नावाच्या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, सुरुवातीला तिने ती नाकारली, पण काही दिवसांनी त्याच शावीने पून्हा रिक्वेस्ट पाठवली. दोघांमध्ये फेसबुक चॅट होऊ लागले. दोघांचा व्हॉट्स अप संवाद सुरू झाला आणि नकळत दोघांमधील मैत्री आणखी घट्ट होत गेली. शावीने स्वतःची ओळख करून देताना ती घटस्फोटित असून दोन मुलांची आई असल्याचे सांगितले. तसेच कौटुंबिक त्रास आणि ती आर्थिक संकटात असल्याची माहिती तिने नागरिकाला दिली.

 

कालांतराने विविध कारणे देत तिने ज्येष्ठ नागरिकांकडून पैसे उकळण्यास सुरूवात केली.दोघांमधील अश्लील चॅटचा गैरफायदा घेऊन कालांतराने ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्याच्याकडून टप्या टप्याने या 22 महिन्यात तबब्ल 734 व्यवहारांद्वारे ९ कोटी रुपये उकळण्यात आले. आपली फसवणूक झाल्याची माहिती ज्येष्ठ नागरिकाला मिळाल्यानंतर त्याला याचा चांगलाच धक्का बसला.

 

अखेर पैसे संपताच संबंधित ज्येष्ठ नागरिकांनं मुलाला पैसे मागितले. त्यांच्या मुलानं वडिलांकडे ९ कोटी रुपये होते मात्र ते का पैसे मागत आहेत असं विचारलं असता ज्येष्ठ नागरिकानं घडलेली सगळी घटना मुलाला सांगितली. दि. 22 जुलै 2025 रोजी या प्रकरणी सायबर पोलिसात ज्येष्ठ नागरिकाने तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या आधारे 6 ऑगस्ट रोजी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.

 

ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरताना नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. सोशन मीडिया वापरताना अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट देखील स्वीकारु नये. याशिवाय फोनवरुन कोणी ओटीपी किंवा पासवर्ड विचारल्यास तो शेअर करु नये असे आवाहन सायबर पोलीसांनी केले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129