
“पुणे पालिका आयुक्तांकडून प्रशासनाची स्वच्छता सुरू”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, पुणे
पुणे पालिका आयुक्तांकडून प्रशासनाची स्वच्छता सुरू, तडकाफडकी बदली, थेट निलंबित तर काहींना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या तसेच वारंवार सुधारण्याची संधी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्यास पुणे म.न. पा.आयुक्त नवल किशोर राम यांनी सुरुवात केली आहे.
शहर स्वच्छतेला महत्त्व देणाऱ्या महापालिका आयुक्तांनी आता प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कारभाराकडे लक्ष देत प्रशासनातील स्वच्छता सुरू केली आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक महापालिकेच्या मुख्य इमारतीत येऊन आपले गाऱ्हाणे मांडतात.
तर काही नागरिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच आयुक्तांची भेट घेऊन तक्रार करतात. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या कामाची दखल घेत त्यावर तातडीने कार्यवाही करावी अशा सूचना महापालिका प्रशासनाने सर्व विभाग प्रमुख अधिकाऱ्यांना दिले आहे.
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण न करणाऱ्या नागरिकांना हेलपाटे मारायला लागणाऱ्या संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी विभाग प्रमुखांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे.
याबाबत कामात दिरंगाई करणाऱ्या तसेच वारंवार सुधारण्याची संधी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्यास आयुक्त नवल किशोर राम यांनी सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात नगर रोड वडगाव शेरी भागातील बेकायदा जाहिरात फलकांची चुकीची माहिती देत महापालिकेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आकाश चिन्ह विभागातील एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करुण दुसऱ्या एका अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस देत खुलासा करण्यास सांगितले होते.
लनिस्सारण विभागांतर्गत देखभाल-दुरुस्तीचा झोन ३, ४ आणि ५ चा पदभार तांदळे यांच्याकडे होता. नवल किशोर राम यांनी युक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर राम यांनी मलनिस्सारण विभागाचा आढावा घेतला. त्यामध्ये त्यांना या विभागाचे कामकाज समाधानकारक नसल्याचे आढळून आल्या मुळे आयुक्तांनी तांदळे यांच्याकडे विचारणादेखील केली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक माहिती देण्यात आली नाही.
महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या कामात वारंवार सूचना करूनही बदल होत नसल्याने महापालिका आयुक्तांनी या विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष तांदळे यांची तडकाफडकी बदली केली, त्यांना पाणीपुरवठा विभागात पाठविण्यात आले आहे. यापूर्वी २०२३ मध्येही महापालिकेचे तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनीदेखील मलनिस्सारण विभागाच्या तक्रारी, जलपर्णीच्या कामाची माहिती न देणे, नोटिशीला उत्तर न देणे, या कारणांमुळे तांदळे यांच्यावर कारवाई केली होती.