
“पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचा जावई सापडला”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, पुणे
पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचा जावई सापडल्याने खळबळ उडाली आहे. या सगळ्यामागे राजकीय कटकारस्थान असल्याचा दावा केला जात आहे.
पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये शनिवारी रात्री सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. यावेळी रेव्ह पार्टी सुरु असलेल्या फ्लॅटमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर हेदेखील आढळून आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर सध्या पुण्यात वेगवान घडामोडी सुरु आहेत.
पुणे पोलिसांकडून याप्रकरणात वेगाने कारवाई सुरु आहे. छाप्यावेळी पोलिसांना रेव्ह पार्टी सुरु असलेल्या फ्लॅटमध्ये पाच पुरुष आणि दोन महिला आढळल्या होत्या. या सगळ्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना आज सुट्टीच्या न्यायालयात हजर केले जाईल.
प्राथमिक माहितीनुसार, डॉ. प्रांजल खेवलकर आणि त्यांचे मित्र आधी पुण्यातील पबमध्ये गेले होते. मात्र, पब बंद असल्याने त्यांनी बीएनबी या ॲपवरुन खराडीतील दोन फ्लॅट हाऊस पार्टीसाठी बुक केला होता. खराडी भागातील स्टे बर्ड गेस्ट हाऊसमध्ये डॉ प्रांजल खेवलकर यांच्या नावाने हे फ्लॅट बुक बुकिंग करण्यात आले होते.
हॉटेल बुकिंगच्या पावत्या समोर आल्या आहेत. दि. २५ ते २८ जुलैपर्यंत हे बुकिंग करण्यात आले होते. रूम नंबर १०१ आणि रूम नंबर १०२ ह्या रुम खेवलकर यांच्या नावाने फ्लॅट बुक करण्यात आले होते. या एका फ्लॅटचे भाडे १० हजार ३५७ रुपये इतके होते. यापैकी एका रुमचे बुकिंग २५ ते २८ तारखेपर्यंत होते तर दुसऱ्या रुमचे बुकिंग २६ जुलै ते २७ जुलै या तारखेसाठी करण्यात आले होते.
पुण्यातील या रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासोबत एक क्रिकेट बुकीही सापडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री तीन वाजता ही रेव्ह पार्टी सुरु झाली. या पार्टीत दारु, हुक्का यासोबत अल्प प्रमाणात गांजा आणि कोकेन सापडल्याची माहिती आहे. पोलिसांनी सध्या अटक केलेल्या सगळ्यांवर गुन्हे दाखल केले असून त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
त्यावेळी पोलिसांकडून प्रांजल खेवलकर यांच्याबाबत काय माहिती दिली जाईल, याकडे सर्व महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहेत.