
“गावठाणाच्या जमिनीवर अतिक्रमण”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
शांता राठोड, यवतमाळ
गावठाणाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्या बाबत बीड तालुका आर्णी येथील गावकऱ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. इंदल बळीराम राठोड अधिक सात लोक राहणार खेड यांनी गावठाण जमिनीवर अतिक्रमण केल्याबाबत बीड येथील गावकऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल केली असून दोषीवर कडक कारवाई करण्याची विनंती केलेली आहे. या तक्रारीचे निवेदन बीड गावकऱ्यांनी आर्णी तहसील कार्यालय येथे सुद्धा दिलेले आहे. याबाबत महाराष्ट्र न्यूज लाईव्हच्या प्रतिनिधी शांता राठोड यांनी निवेदन करणाऱ्यांसोबत बात- चिंत केली व प्रत्यक्ष भेट घेतली असता निवेदनकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांच्या अडचणी सांगितल्या.