♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” पुण्यात बेकायदेशीर शस्त्र वापरणाऱ्यांमध्ये ४५ जण अटकेत”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

दिलीप चव्हाण, पुणे 

 

पुण्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. दररोज पुण्यात गुन्ह्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. अशाच आता पिंपरी चिंचवड पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत.

 

बेकायदेशीर वापरण्यात येणारी हत्यारे जसे की ७९ जिवंत काडतुसे, ५० पिस्तूल जप्त केल्या आहेत. तसेच काही आरोपींकडे असलेली धारदार शस्त्रेही ज्यामध्ये ९१ कोयते आणि १२ तलवार जप्त करण्यात आली आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान, आरोपींवर गुन्हे शाखेच्या युनिट्सने राबवलेल्या विविध मोहिमांमध्ये प्राणघातक शस्त्रे आणि धारदार बेकायदेशीरपणे हत्यारे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहिम राबवण्यात आली होती.

 

पोलिसांनी बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या ४० जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये एकूण ४५ जणांना अटक केली असून. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण ५० पिस्तूल आणि ७९ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

 

धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. संबंधित प्रकरणात एकूण ९४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ६६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

त्यांच्याकडून ९१ कुऱ्हाडी आणि १२ तलवारींसह एकूण ११६ धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129