
“कळमनुरी येथील महावीर भवन येथे कावड यात्रेनिमित्त आढावा बैठकीचे आयोजन”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
योगेश जाधव हिंगोली
कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या भव्य कावड यात्रे निमित्त या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून हजारोंच्या संख्येने नागरीकांना उपस्थित रहावे असे आवाहन आमदार संतोष बांगर यांनी या सभेच्या दरम्यान केले.
कळमनुरी विधानसभेमध्ये ठिकठिकाणी या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ४ ऑगस्टला चिंचाळेश्वर महादेव मंदिर येथून या कावडीचे पायी आयोजन करण्यात आले आहे. या कावड यात्रेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सुद्धा सहभागी होणार असल्याने आमदार बांगर यांनी सांगितले.
या बैठकीला कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर, ॲड संतोष राठोड, जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, शिखरे, सरपंच मस्के, प्रमोद चव्हाण सरपंच, बबलू पत्की, शैलेश पवार, श्रीराम दादा बांगर, यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.