
“कळमनुरी येथे मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिसानिमित्त ८५ लोकांनी केले रक्तदान”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
योगेश जाधव कळमनुरी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन कळमनुरी शहर मंडळ व ग्रामीण मंडळा तर्फे आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ८५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपला सहभाग नोंदवीला.
रक्तदान शिबिर भाजपा जिल्हाध्यक्ष मा. आमदार गजाननराव घुगे व राज्य परिषदेचे सदस्य मा आमदार रामरावजी वडकुते यांची प्रमुख उपस्थितीत होती. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या आवाहना नुसार त्यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले होते.
त्या अनुषंगाने आज कळमनुरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कळमनुरी शहर मंडळ व कळमनुरी ग्रामीण मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त संकलनाचे काम वाशीम येथील गजानन रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी केले.
या कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष मा. आमदार गजाननराव घुगे व राज्य परिषदेचे सदस्य मा. आमदार रामरावजी वडकुते, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशराव नाईक, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव नागरे, वर्षाताई खंदारे राज्य परिषद सदस्या, तसेच सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष राहुल मेने, तालुका अध्यक्ष विठ्ठलराव भोयर, शहराध्यक्ष ओमकारजी नावडे, उमेश सोमाणी, रमेश पाठक,अमिष दरक, योगेश संगेकर, नारायण डुरे, बबन आप्पा पंचलिंगे, संतोष पवार, मुकेश इंगोले, जिद्दी पाटील, पारस मांडवगडे, कैलासराव शिंदे, हनुमंत सूर्यवंशी, विकास जाधव, पुंजाजीराव काकडे, शिवाजीराव मस्के, दौलतराव धनवे, अरुण पतंगे, संजय कोटकर, नागोराव ढाले, माधवराव कोटकर, सुरेश ढेंगळे, ओम प्रकाश शिंदे, सोपान घुगे, शंकर कांबळे, विजयराव निरगुडे, रुखमाराव शिंदे, मसाराव करे, अर्जुन बोरकर, तुकाराम नाईक, राहुल देशमुख, बालाजी काकडे, बाळू घुसे, इनदेश काबरा, सौ. शालू डोंगरे, वंदना कांबळे, सुनिता कोरडे, मीनाक्षी जमदाडे, रेणुका गिरे , पूनम देवकते, दत्तराव किरवले, नागोराव बेले यांच्यासह कळमनुरी येथील नागरीक भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होते.