
“अंगणवाडी कर्मचाऱ्यांनसाठी आनंदाची बातमी”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, मुंबई
मुंबईतील आझाद मैदान, जिल्हा प्रशासन कार्यालये, आणि इतर ठिकाणी अनेक वेळा मोर्चे काढण्यात आले. अंगणवाडी सेविकांनी लढा दिला, आंदोलन केले, निवेदनं दिली — परंतु मागण्यावर वारंवार दुर्लक्ष होत गेले. २१ राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. याबाबत आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे आदींनी अंगणवाडी सेविकांच्या किमान वेतन, नियमित मानधन व इतर मागण्यांबाबत प्रश्न उपस्थित केले.
आमदारांच्या प्रश्नाला मंत्री आदिती तटकरे यांचे उत्तर:- मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले की, “एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत केंद्र व राज्याच्या निधीतून मानधन अदा करण्यात येते. काही काळ निधी उशिरा मिळतो, मात्र तात्काळ कार्यवाही करून मार्च २०२५ चे मानधन २५ एप्रिलला, तर एप्रिलचे मानधन ६ मे ला अदा करण्यात आले .
राज्यातीलल अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावावर सरकार कार्यरत असल्याची माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. सेविकांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला यश मिळालं असून सरकारला या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून निर्णय घ्यावा लागला आहे.
सरकारच्या निर्णयाचे कौतुक :
अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी देण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने एक मानवी संवेदनशीलता दाखवणारे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सामाजिक बांधिलकी जपत, महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे दिसून येते.
सेवेनंतरही नियमित उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होणार असल्याने त्यांचा भविष्यकाळ अधिक सुकर होईल. आणि यामुळे केवळ सेविकाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांनाही या योजनेचा थेट लाभ होणार आहे. सरकारकडून या कामासाठी निधीची तरतूद करून LIC व अन्य संस्थांमार्फत योजना राबविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली.