
“सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींची शिक्षकाने काढली छेड”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दयानंद राठोड, बीड
केज तालुक्यातील सुर्डी (सोनेसांगवी) येथील जिल्हा परिषद शाळेतील एका नराधम शिक्षकाने चक्क सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढून शिक्षण क्षेत्राला आणि शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचा निंदनीय प्रकार केला आहे. हा खळबळजनक प्रकार उघड झाल्यामुळे नागरिकांत तीव्र संतापाची लाट निर्माण झालेली आहे.
दि.३ जुलै २०२५ रोजी गुरुवारी दुपारी २:०० वा. च्या दरम्यान शाळेच्या मध्यंतर वेळी कॅरम खेळत असलेल्या सहावीच्या मुलींच्या अंगाला वाईट हेतूने स्पर्श केला आणि त्यांच्याशी तुमचे नवरे निवडा, अशा प्रकारे बोलून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
त्या नंतर एका मुलीनी हा प्रकार घरी तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर दि. ८ जुलै रोजी एका पालकाने गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या बाबतची लेखी तक्रार त्यांना सादर केली. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ स्वतः गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर, केंद्र प्रमुख अर्जुन बोराडे व केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली. लक्ष्मण बेडसकर, गटशिक्षणाधिकारी, केज यांनी या प्रकरणी पालकांचा तक्रार अर्ज प्राप्त होताच आम्ही शाळेला भेट देऊन चौकशी केली असून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर केला असल्याची माहिती आहे.