
“मौजे डोंगरगाव पुल येथे घरकुल घोटाळा”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
योगेश जाधव, कळमनुरी
कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव फुल येथील रहिवासी असलेले भीमराव नारायण वाठोरे, गंगाबाई वाठोरे व प्रदीप वाठोरे यांनी डोंगरगावामध्ये झालेल्या घरकुल घोटाळ्यात बाबत आमरण उपोषण सुरू केले आहे.
कळमनुरी पंचायत समिती मधील या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात उपोषण सुरू केले. मा. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी जि.प. हिंगोली यांच्या सह अनेक वरिष्ठांना याप्रकणाची सखोल चौकशीची करण्याची मागणी केली आहे. मौजे डोंगरगाव पूल येथे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोठा घोटाळा घडला असल्याने त्यांनी आपल्या निवेदनातून आरोप केला आहे.
अनेक घरकुल लाभार्थ्यांना त्यांचा हप्ता मिळालेला नाही. बरेचसे घरकुल फक्त कागदोपत्री दाखवून शासकीय निधीचा गैरवापर करून गावातील लाभार्थ्यांचे पैस्याचा अपहार केले आहे. यासंबंधी सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी आमरण उपोषणाच्या माध्यमातून वाठोरे परिवाराने केली आहे.