
“क्षणात पत्नीने स्वतःला झोकून देत जीवन संपवलं”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, नागपूर
नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीवर नेरी पुलावर शनिवारी दुपारी एक विचित्र सर्वत्र खळबळ उडाली आहे. कन्हान नदीवरील नेरी पुलावरून जात असताना एका दंपत्याने निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबविली.
त्या नंतर क्षणात (२३ वर्षीय) महिलेने अचानक पुलावरुन नदीत उडी मारली. रामटेक तालुक्यातील चाकुरवाही गावातील रहिवासी ज्ञानेश्वरी विजय साकोरे वय (२३ वर्षे) महिलेचे नाव असून त्या सध्या मानेवाडा नागपूर येथे पती विजय सोबत राहत होत्या.
काही काळाच्या आताची ही घटना घडली पतिच्या डोळ्यादेखत ज्ञानेश्वरीने आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी ३ वाजता च्या सुमारास साकोरे दाम्पत्य कार मधून चाकूरवाही गावाकडे जात होते.
या दरम्यान कार कन्हान नदीच्या निरी पुलावर आली असता निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबली आणि त्यानंतर दोघांनीही काही वेळा त्या पुलावर घालवला. यादरम्यान दोघांनी मोबाईल मध्ये सेल्फी देखील घेतला. मात्र काही क्षणातच ज्ञानेश्वरीने अचानक पुलावरून नदीत उडी मारली हे दृश्य पाहताच पती विजय साकोरे यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी जोर जोरात आरडा ओरड केली. जवळपास कोणीही नसल्याने कुठलीही त्यांना मदत मिळू शकली नाही.
अंतर उशिरा घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी स्थानिक गोताखोराच्या मदतीने तत्काळ शोध म्हणून राबवली. बराच काळ शोध घेऊनी ज्ञानेश्वरीचा शोध लागला नाही. अखेर संध्याकाळच्या अंधारामुळे शोध कार्य थांबवावे लागले. ज्ञानेश्वरीने एवढे मोठे टोकाचे पाऊल नेमके का उचलले ? आणि त्या मागचं सत्य काय आहे? हे अद्याप कळू शकले नाही. पती विजय साकोरे यांचा पोलिसांनी जबाब नोंदविला असून पुढील तपास कामठे पोलीस करत आहेत.