♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“ महाराष्ट्रातील १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

ज्ञानेश्वर चव्हाण, मुंबई 

 

महाराष्ट्रातील पंधरा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने २ जुलै रोजी हे आदेश काढले असून लवकरच नियुक्त जागी रुजू होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली झाली हे आपण समजून घेऊया.

1. जगदीश मिनियार (IAS 2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांची मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, छत्रपती संभाजी नगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

2. वर्षा लड्डा (IAS 2015) व्यवस्थापकीय संचालक, MAVIM, मुंबई यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद, पुणे येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. वैभव वाघमारे (IAS 2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम यांची मुंबई येथे अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

4. मिन्नू पी.एम. (IAS 2021) सहायक जिल्हाधिकारी, भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. अर्पित चौहान (IAS 2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, नाशिक-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6. सिद्धार्थ शुक्ला (IAS 2023) सुपर न्युमररी असिस्टंट कलेक्टर, गडचिरोली यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7. लघिमा तिवारी (IAS 2023) सुपर न्युमरी असिस्टंट कलेक्टर, यवतमाळ यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

8. अनुष्का शर्मा (IAS 2023) सुपर न्युमरी असिस्टंट कलेक्टर, नांदेड यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, कुरखेडा उपविभाग, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

9. डॉ.जी.व्ही.एस.पवंदत्ता (IAS 2023) सुपर न्युमरी असिस्टंट कलेक्टर, नंदुरबार यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10. डॉ. कश्मीरा किशोर संखे (IAS 2023) सुपर न्युमरी असिस्टंट कलेक्टर, चंद्रपूर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

11. डॉ. बी. सरावनन (IAS 2023) सुपर न्युमरी असिस्टंट कलेक्टर, धुळे यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, भोकरदन उपविभाग, जालना म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

12. अर्पिता अशोक ठुबे (IAS 2023) सुपर न्युमररी असिस्टंट कलेक्टर, बीड यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, नाशिक-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

13. अमर भीमराव राऊत (IAS 2023) सुपर न्युमरी असिस्टंट कलेक्टर, अमरावती यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, वरोरा उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

14. रेवैया डोंगरे (IAS 2023) सुपर न्युमरी असिस्टंट कलेक्टर, वर्धा यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, भूम उपविभाग, धाराशिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

15. अरुण एम (IAS 2023) सुपर न्युमररी असिस्टंट कलेक्टर, जालना यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, चारमोशी उपविभाग, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129