♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“हातावर सुसाईड नोट लिहून महिला डॉक्टरची आत्महत्या”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

सुनील जाधव, सातारा

 

साताऱ्यातील फलटण शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर यांनी काल रात्री टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

 

महिला डॉक्टरांनी शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या केवळ फलटण उपजिल्हा रुग्णालयच नव्हे, तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. आता याप्रकरणी मृतकाची सुसाईड नोट समोर आली आहे. यात तिने दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

 

मृतक महिला डॉक्टर यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या मृत्यूला PSI गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे दोन पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचे म्हटलं आहे.

 

त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतक महिला डॉक्टरांनी तिच्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहिली आहे.

 

यात तिने दोन पोलीस कर्मचारी आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आणि त्यांनी शारीरिक, मानसिक छळ केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

 

काय आहे सुसाईड नोटमध्ये?

 

मृतक महिला डॉक्टरांनी यांनी आपल्या ‘सुसाईड नोट’मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की: “माझ्या मरणास पोलीस निरिक्षक गोपाल बदने जबाबदार आहे, ज्याने ४ वेळा माझ्यावर अत्याचार केले.

 

तसेच, पोलीस प्रशांत बनकर यानेही मागच्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला.”

 

नेमके कारण काय?

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका कथित वादात अडकल्या होत्या.

 

एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादामुळे त्या चर्चेत होत्या आणि या प्रकरणानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशीदेखील सुरू होती.

 

या तणावामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी एका महिला डॉक्टरांनी पोलीस अधिकाऱ्यावर थेट अत्याचार आणि छळाचे आरोप केले आहेत.

 

त्यामुळे साताऱ्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता दोन्ही आरोपी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आदेश देऊन दोन्ही पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129