श्री. रमेश महाराज (पोहरा देवी) यांचा “खाट आंदोलनाचा इशारा”
शंकर आडे, मनोरा
श्री. रमेश महाराज पोहरा (देवी) यांनी मनोरा तहसील कार्यालय येथे बंजारा समाजाच्या वतीने निवेदन दिले होते. त्यात त्यांनी काही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत.
रमेश महाराज यांच्या प्रमुख मागण्या :-
१) धावंडा, वडगाव, पोहरा (देवी) सावळी, शेंदुरा या परिसरातील शेतकरी बांधवांचे वन्य प्राण्यापासून शेत मालाचे जे नुकसान होते आहे त्या करिता काटेरी तारांचे कुंपण करणे बाबत.
२) शेतकऱ्यांची सर सकट कर्ज माफी करणे बाबत.
३) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी ५ लाख रुपये अनुदान देण्याबाबत.
४) लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१००/- रुपयाचा हप्ता देणे बाबत.
५) पोहरा (देवी) ते धावंडा, पोहरा (देवी) ते काकड चिखली रस्ता करुन देणे बाबत.
अश्या विविध मागण्या दि.११/०६/२०२५ पर्यंत पूर्ण न केल्यास “खाट यात्रा” काढण्यात येईल असे निवेदन यापुर्वी रमेश महाराज यांनी तहसील कार्यालय येथे दिले होते. रमेश महाराज यांच्या मागण्या बाबत शासनाने दि. १८/०६/२०२५ पर्यंत कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे रमेश महाराज यांनी आज रोजी मानोरा येथे आपल्या विविध मागण्यासाठी “खाट मोर्चा ” म्हणजेच जीवंत प्रेत यात्रा काढली.
त्या खाटेवर स्वता रमेश महाराज लेटून ती खाट यात्रा मानोरा तहसील कार्यालया समोर आणण्यात आली.
रमेश महाराज यांच्या या “जीवंत प्रेत यात्रा खाटने ” मानोरा तालुक्यातील सर्व सामान्य जनतेचे तसेच शासनाचे लक्ष वेधून घेतले. रमेश महाराज यांनी आपल्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी ही जीवंत खाट यात्रा काढून आगळे वेगळ्या मार्गाने आंदोलन छेडले असून या आंदोलनाची ठिक-ठिकाणी चर्चा होत आहे.
रमेश महाराज यांनी आपल्या मागण्या तहसील कार्यालया मार्फत शासन दरबारी पोहचविण्याचा साठी तहसील कार्यालयात आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले.