♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“निवासी उपजिल्हाधिकपदी अतिरिक्त जिल्हाधिकारी करणार”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

ज्ञानेश्वर चव्हाण, नागपुर

 

जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी हे पद महत्वाचे असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी ते पद अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रेणीमध्ये रूपांतरीत करण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे शुक्रवारी जाहीर केले.

 

नियोजन भवन येथे महसूल दिन व सप्ताहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार परिणय फुके, चरणसिंग ठाकूर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महसूल अपर आयुक्त राजेश खवले, अपर जिल्हाधिकारी प्रविण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे उपस्थित होते.

 

यावेळी महसूलमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते आपले सरकार सेवा केंद्राचा पोर्टलचे अनावरण, नागपूर ग्रामीण कार्यालयाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण, डिजिटल गाव नकाशा पोर्टलचे लोकार्पण.

 

प्रधानमंत्री आवास योजना, जात प्रमाणपत्र वितरण, मालकीहक्काचे पट्टे वाटप, रेशन कार्ड वितरण, भूमिअभिलेख विभागातर्फे सनद वाटप करण्यात आले. येत्या तीन महिन्यात झिरो पेन्डंसी उपक्रम राबवा मंत्रालयस्तरावर महसुलासंदर्भात प्रलंबित असलेल्या १३ हजार प्रकरणे निकाली काढण्याचा संकल्प असून त्याप्रमाणेच नायब तहसिलदार ते जिल्हाधिकारीस्तरापर्यंत प्रलंबित असलेले महसूली प्रकरणे येत्या तीन महिन्यात निकाली काढण्याचा झिरो पेन्डंसी उपक्रम राबवा, अशा सूचना महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिल्या.

 

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये अपर जिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी वंदना सवरंग पते, विशालकुमार मेश्राम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, दत्तात्रय निंबाळकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड, नगर भुमापन अधिकारी प्रशांत हांडे, उपअधीक्षक श्याम पेंदे, नायब तहसीलदार प्रतिभा लोखंडे, सचिन शिंदे, नितीन गोहणे, सहायक महसूल अधिकारी निजाम शेख, मंडळ अधिकारी पंकज तांबे, महसूल सहायक अमरदीप शिरसाट, तलाठी पवन राणे, स्वीय सहायक संजय गिरी, शिपाई रामेश्वर पुरी, सोनु भुरे, वाहनचालक समीर दांडेकर, कोतवाल अनिल उरकुडे, पोलीस पाटील बाळकृष्ण चौधरी, निवृत्त नायाब तहसीलदार अरूण भुरे, अर्चना तितरमारे यांचा समावेश आहे.

 

यावेळी १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129