
“बोगस कर्मचाऱ्यांचा बँकेला ६३ लाखांचा गंडा”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, मुंबई
जून २०२३ मध्ये प्रफुल्लता चव्हाण, नरेश रामसिंग, अतुल तिवारी आणि कृष्णा तिवारी यांनी महापालिका कर्मचारी असल्याचा दावा करत १५ लाखांच्या पर्सनल लोनसाठी बॅके कडे ऑनलाइन अर्ज केला होता. या चौघांना बॅके कडून एकूण ६३ लाखांचे कर्ज मंजूर केले. चौघांनी कर्जाचे काही हप्ते भरले. मात्र, नंतर उर्वरित हप्ते थकविल्यामुळे बँक कडुन कर्जदारांना फोन केला असता त्यांचा फोन बंद येत होता त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराच्या पत्त्यावर भेट देत चौकशी केली असता ते तेथे सापडले नाहीत.
त्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी संबंधित पालिका कार्यालयांत जाऊन चौकशी केली. त्यावेळी ते पालिका कर्मचारी नसल्याचेही उघड झाले. बनावट कागदपत्रांद्वारे महापालिका कर्मचारी असल्याचे भासवत चौघांनी आयसीआयसीआय बँकेच्या अंधेरी एमआयडीसी शाखेतून कर्ज घेऊन ६२ लाख ८१ हजार ५३१ रुपयांची बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
आयसीआयसीआय बँकेतील लोन रिलेशनशिप मॅनेजर देवेंद्र नायक यांनी प्रफुल्लता चव्हाण, नरेश रामसिंग, अतुल तिवारी आणि कृष्णा तिवारी या चौघां विरोधात फसवणूक प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारी वरुन चौघा विरुद्ध गुन्हा नोंदविला, असून एम आय डि सी पोलीस पुढील तपास करीत आहे.