” सुनील शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांचा ‘धरावी बँक’ चा टीझर रिलीज “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि तिथली गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ‘धारावी बँक’ या वेबसीरिजचा टीझर नुकताचा प्रदर्शित झाला आहे. ५० सेकंदाच्या या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन आपल्याला बघायला मिळत आहे.
अंडरवर्ल्ड कनेक्शनच्या पलीकडे जाऊन ‘धारावी’ परिसरातील एक वेगळीच गोष्ट आपल्यासमोर या सीरिजमधून उलगडणार असल्याचं या टीझरवरुन स्पष्ट होत आहे. शिवाय अभिनेता सुनील शेट्टी या सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे. गुन्हेगारी विश्वाचा सर्वेसर्वा ‘थलाईवन’ हे पात्र सुनील शेट्टीने साकारलं आहे. याबरोबरच विवेक ओबेरॉयसुद्धा यामध्ये जेसीपी जयंत गावस्कर या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
एकंदरच या सीरिजमधून एक वेगळं गुन्हेगारी विश्वातील एक वेगळं कथानक आपल्यासमोर उलगडेल असं या ट्रेलरवरुन जाणवत आहे. सुनील शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांच्याबरोबरीने सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, नागेश भोसले, चिन्मय मांडलेकरसारखे मराठी कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच या सीरिजचा ट्रेलरही प्रदर्शित होणार आहे.