
“पुराचे पाणी घुसले घरात”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, मानोरा
मानोरा तालुक्यातील मौजे आसोला (खुर्द) येथे नदीकाठी राहणाऱ्या मारोती बंडू आमटे यांच्या घरात दि. २९ ऑगस्ट रोजी पुराचे पाणी घरात घुसल्याने संसार उपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
शुक्रवारी पहाटे ५ वाजतापासून अतिवृष्टी ग्रस्त मुसळधार पावसाने दोन तास हजेरी लावल्याने गावाच्या नाल्याला पूर आला. या पुराचे पाणी घरात घुसल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामा करून शासनाची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पिडीत आमटे कुटुंबाच्या वतीने करण्यात आली आहे.
मी भूमिहीन असून मजुरीचे काम करून कुटुंबाचे पालनपोषण करतो. नाल्याचे पुराचे पाणी शुक्रवारी घरात घुसल्याने घरात ठेवलेले अन्नधान्य व साहित्य वाहून गेले. त्यामुळे माझ्या कुटुंबातील दोन लहान मूकबधीर मुले, पत्नी व माझ्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. मानोरा तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देवून आम्हाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला मारोती आमटे यांनी दिली.