♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“महाराष्ट्र सरकारने ५ आय.ए.एस. अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

दिलीप चव्हाण, मुंबई

 

प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी ही बदली प्रक्रिया तातडीने करण्यात आली. बदल्यांमध्ये जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश. बदली आदेश प्रशासन विभागाद्वारे जारी करण्यात आले आहेत.

 

राज्यात स्वराज संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. सरकारकडून गेल्या पाच सहा महिन्यांपासून बदल्यांचं सत्र सुरु आहे.काही दिवसापूर्वीच राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. आता परत राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

 

नाव-कुठे बदली झाली :-

 

1) श्री. अजीज शेख, भाप्रसे, व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई येथून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे या पदावर.

 

2) श्री. अशीमा मित्तल, भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक येथून जिल्हाधिकारी जालना या पदावर.

 

3) श्री. श्रीकृष्णनाथ पांचाळ, भाप्रसे, जिल्हाधिकारी, जालना येथून जिल्हाधिकारी, ठाणे या पदावर.

 

4) श्री. विकास खारगे, भाप्रसे, मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई येथून अप्पर मुख्य सचिव महसूल मंत्रालय, मुंबई या पदावर

 

5) श्री. अनिल डिग्गीकर, भाप्रसे, अप्पर मुख्य सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई येथून अपर मुख्य सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर

अश्या प्रकारे बदल्या करण्यात आल्या आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129