
“अपात्र बहिणींच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, मुंबई
लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी, अपात्र लाडक्या बहिणींच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या आहेत. दुसरीकडे योजनेत घुसखोरी केलेल्या बोगस भावांनाही नोटीस पाठवली जाणार आहे.
लाडकी बहिण योजनाचे निकष :
एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी, वयाचा निकष पूर्ण न करणे, सरकारी कर्मचारी आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त अशा महिलांच्या याद्या जिल्हाधिका-यांकडे पाठविल्या आहेत.
बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांना याद्या पाठवून अंगणवाडी सेविकांकडून लाभार्थ्यांची पडताळणी होईल. अपात्र असतानाही अर्ज करणा-यांची संख्या ४० लाखांवर आहे. त्यात १४ हजारांहून अधिक पुरुष आहेत. अपात्र लाभार्थ्यांवर तब्बल सहा हजार कोटीहून अधिक रक्कम वितरीत झाली आहे. बँकांशी पत्रव्यवहार करून अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यातील रक्कम रोखली जाणार आहे.
एकट्या सोलापूर जिल्ह्यात ४३० पुरुष लाभार्थी असून त्यांच्याकडून पहिल्या टप्प्यात पुरुष लाभार्थ्यांकडून वसुल केली जाणारी रक्कम तब्बल २० कोटींपेक्षाही अधिक आहे.
एकूण लाभार्थी ११,०९,४८७
दरमहा वितरीत निधी – १६६ कोटी ४२ लाख
अपात्र लाभार्थी – १ लाख ९७ हजार
पुरुष लाभार्थी – ४३०
पुरुष लाभार्थ्यांकडून २३ कोटी १० लाख रुपये वसूल करणार.
एका जिल्ह्यातील जर ही आकडेवारी असले तर संपूर्ण राज्यात असे किती अपात्र लाभार्थी असतील याची कल्पना करा. दुसरीकडे पुरुष लाभार्थ्यांना रक्कम परत करण्यासाठी महिनाभराची मुदत सरकार देणार आहे.
अपात्र लाडक्या बहिणींचीही प्रशासनाकडून कसून पडताळणी केली जाणार आहे. काटेकोर छाननीनंतर आता भविष्यात तरी गरजू महिलांनाच लाभ मिळून योजनेचं उद्दीष्ट पूर्ण होणार का?





