♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“दि. ३० आक्टोबर रोजी बंजारा समाजाचा समृद्धी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय”

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 

 

दिलीपकुमार चव्हाण, वाशिम

 

बंजारा समाजाची काशी पोहरादेवी (जि. वाशिम) येथे दि. २३/१०/२०२५ रोजी दानशूर बाबणाजी महाराज सभागृह पोहरा देवी येथे बंजारा समाजाची बैठक घेण्यात आली. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियर नुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या संविधानिक मागणीसाठी बंजारा समाजाने आजपर्यंत तालुका आणि जिल्हास्तरावर जवळपास ५७ मोर्चे काढले असून या मोर्चामध्ये बंजारा समाजाच्या लाखो माता-भगिनी, युवक, पुरुष महिलांनी भाग घेतला.

 

तालुकास्तरावर ५० हजार आणि जिल्ह्याच्या ठिकाणी ५ लाख समाज बांधव एकत्र होऊन हे मोर्चे काढण्यात आले. परंतु शासनाने बंजारा समाजाच्या मोर्चाची साधी दखल सुद्धा घेतली नाही म्हणून संपूर्ण बंजारा समाज आज रस्त्यावर पेटून उठला असून एसटी मधून आरक्षण मिळावे यासाठी तीव्र आंदोलन करण्याचे या बैठकीमध्ये ठरले आहे.

 

या बैठकीमध्ये महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितू महाराज, प्रा. अनिल राठोड गोर सेना संयोजक, यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. बंजारा समाजाने अनेक मोर्चे काढूनही हे शासन आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे दिनांक ३० नोव्हेंबर रोजी समृद्धी महामार्गावर रस्ता रोको करून चक्काजाम करण्याचा निर्णय या मीटिंगमध्ये घेण्यात आला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129