
“मुसळधार पावसामुळे बैलजोडी पुरात वाहून गेली”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
वाशिम जिल्ह्यासह मानोरा तालुक्यात आज दुपारी तीन ते चार वाजताचे दरम्यान ढगफुटी, विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस सुरू झाला काही वेळातच नदीनाल्याला पुर येऊन नदीनाले दुधडी भरुन वाहत आहे.
तसेच मानोरा तालुक्यातील बेलोरा या गावातून जाणाऱ्या खोराडी नदीला मुसळधार पावसामुळे पुर आला असून नदी काठाशेजारील शेतकरी पावसामुळे आपल्या शेतातील कामे आटोपून बैलगाडी घरी जात असताना पांदण रस्त्याजवळील नदी ला कमी प्रमाणात पुर होता नदी ओलांडताना अचानक नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली व पाण्याचा मोठा लोंढा आल्याने बैलजोडी पुरात वाहून गेली आहे. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.