♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“आंदोलकाच्या कमरेत लाथ मारली”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

दिलीप चव्हाण, जालना

 

 

स्वातंत्र्यदिनानिमित्त जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एक विचित्र प्रकार घडला. पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न एका आंदोलकाने केला.त्याला रोखण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं असताना आंदोलकाच्या कमरेत DYSP अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईलने लाथ घातल्याची घटना घडली.

 

त्याघटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात या घटनेवर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता DYSP अनंत कुलकर्णी यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे.

 

DYSP अनंत कुलकर्णी यांचं स्पष्टीकरण

 

DYSP अनंत कुलकर्णी म्हणालेत की, गोपाल चौधरी हे मागच्या काही दिवसांपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. यावेळी पोलिसांनी त्यांची अनेकवेळा समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

 

इतकं करून देखील 15 ऑगस्टला पंकजा मुंडे दौऱ्यात असताना त्यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता

 

त्यांनी पोलीस महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल टाकलं म्हणून त्यांना ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर केल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी स्पष्टकरण दिलं आहे.

 

काय आहे प्रकरण?

 

जालना शहरातील चौधरी कुटूंबातील सून ही लग्नानंतर घटस्फोट न घेता निघून गेली. एवढंच नाही तर तिने दुसरं लग्न ही केलं याची तक्रार कुटूंबातील पती गोपाळ आणि रमेश चौधरी यांनी पोलिसात केली होती.

 

मात्र पोलिसांनी सुनेच्या उलट तक्रारीवरूनच चौधरी कुटुंबावर कौटुंबिक वादातून जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याचं गुन्ह्यामुळे चौधरी कुटुंबानी गेल्या अनेक दिवसापासून सुनासह त्यांच्या नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून आंदोलनाचा पावित्र घेतला.

 

मात्र कुणीचं दाद देत नसल्याने स्वातंत्र्यदिनानिमित्त जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या जालना दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा जात असताना चौधरी कुटुंबातील आंदोलकांने पंकजा यांचा ताफा अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न केला.

 

यावेळी पोलिसांनी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं.त्याचवेळी आंदोलकांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असतानाच जालन्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी चक्क पाठीमागून धावत येऊन कंबरेत फिल्मी स्टाईल लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या सर्व प्रकारामुळे आंदोलकांप्रमाणेच सामान्यांमध्येही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129