
“मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्याचा प्रताप”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, मुंबई
१६८६ ला हिरानंदानी बिल्डर, राज्य सरकार व एम.एम.आर.डी.ए यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. त्यानुसार हिरानंदानी, पवई येथील काही जागा राज्य सरकारने हिरानंदानी बिल्डरला विकासासाठी दिली होती आणि त्याबदल्यात हिरानंदानी बिल्डर हे हिरानंदानी पवई येथील १२९६ सदनिका राज्य सरकारला देणार होते. ह्या सदनिका राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १३५ रुपये प्रति चौरस फूट दराने विक्री कराव्यात असे आदेश दिले होते.
नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी असलेले राजेश गोविल यांनी ब्लू बेल इमारत येथील शासकीय कोट्यामधील निवासस्थाने नावावर करुन देतो, असे आमीष दाखविले आणि या १८ शासकीय कर्मचाऱ्यांना गोविल यांना प्रत्येक कर्मचाऱ्यांनी १० ते १५ लाख रुपये टप्याटप्याने २०२१ पर्यंत दिले. असे एकूण गोविल यांना तब्बल २ कोटी ६१ लाख ५० हजार रुपये दिले.
मात्र त्याने दिलेली मुदत संपूनही सदनिका नावावर झाल्या नाहीत तसेच गोविल याने पैसे परत देण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार घडला. त्यामुळं आपली फसवणूक झाली यामुळे रक्कम देणारे अधिकारी सावध झाले आणि त्या सर्व फसवणूक झालेल्याअधिकाऱ्यांनी याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारी वरुन पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन पवई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.