♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“पोहरा देवी येथे बंजारा समाजाच्या वतीने दसरा मेळावा संपन्न”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

दिलीपकुमार चव्हाण, वाशिम 

 

बंजारा समाजाची काशी पोहरा (देवी) येथे २ आक्टोबर २०२५ रोजी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला जालना, बीड, परभणी, यवतमाळ, अमरावती, अकोला, नांदेड, कळमनुरी, हिंगोली, बुलडाणा यासह महाराष्ट्र भरातून अनेक बंजारा समाजबांधव या दसरा मेळावा कार्यक्रमाला उपस्थित झाले.

 

यामध्ये प्रामुख्याने आमदार राजेश राठोड जालना, संजय राठोड बुलडाणा, माजी खासदार हरीभाऊ राठोड मुंबई, डॉ. टी. सी. राठोड यवतमाळ, डॉ. बी. डी. चव्हाण नांदेड, राजुसिंग नाईक मुंबई, अविनाश चव्हाण जालना, प्रा. अनिल राठोड वाशिम, ॲड. सुधाकर जाधव दिग्रस, अनिल गंगाधर राठोड वाई यांच्यासह बंजारा समाजासाठी काम करणाऱ्या वेग-वेगळ्या संघटनेचे पदाधिकारी, अनेक बंजारा समाजाचे मान्यवर मंडळी तथा मोठ्या संख्येने समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंजारा समाजाचे धर्मगुरू तथा विधान परिषदेचे आमदार संत बाबुसिंग महाराज हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितू महाराजांनी केले. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील तालुके, जिल्हा-जिल्ह्यातुन बंजारा समाजाकडून मोर्चे काढले जात आहे.

 

बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळविण्यासाठी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा येथे ठरविण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडवणीस साहेब यांनी बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबुसिंग महाराज, विधान परिषद सदस्य यांना दि. ८ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे बैठकीसाठी निमंत्रित केले आहे.

 

दि. ८ ऑक्टोंबर रोजीच्या बैठकीत तमाम बंजारा समाजाच्या वतीने धर्मगुरू बाबूसिंग महाराज बंजारा समाजाला एसटी प्रर्वगामधुन आरक्षण मिळावे यासाठी एक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. या बैठकीकडे तमाम बंजारा बांधवांचे लक्ष लागले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129