“महावितरनाच्या अभियंत्याला नोटीस”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, पुणे
वारजे भागातील रामनगर परिसरात विजेचा धक्का लागून मयंक प्रदीप अडागळे या दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना १४ मे रोजी घडली होती. याबाबत पावसाळी अधिवेशनात खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मागणी केली होती.
त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. पुण्यात महावितरणच्या अभियंत्याला नोटीस, आणि मृताच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत;
मुख्यमंत्री फडणवीसांनी वारजे भागातील रामनगर येथे विजेचा धक्का लागून दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली असून, महावितरण कंपनीला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
महावितरण कंपनीच्या विद्युतभारित लोखंडी विजेच्या खांबाच्या संपर्कात आल्याने मुलाचा धक्का बसून मृत्यू झाला. मात्र, अशा प्रकारच्या घटना यापूर्वी झालेल्या नाहीत. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.