
“अमरावती येथे ७ पीएसआय बनले पदोन्नतीने एपीआय निरीक्षक”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, अमरावती
पोलिस गृहविभागाने राज्यभरातील ३४१ उपनिरीक्षकांना (पीएसआय) सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) म्हणून पदोन्नत केले आहे. हा पदोन्नतीचा आदेश गृह विभागाने काढला आहे. त्यानुसार, अमरावती ग्रामीण पोलिस दलातील पाच व शहर आयुक्तालयात कार्यरत दोन अशा एकूण ७ पोलिस उपनिरीक्षकांना आता सहायक पोलिस निरीक्षक पदोन्नतीने मिळाल्यामुळे त्यांची बदली जिल्ह्याबाहेर झाली आहे. याच वेळी शहर पोलिस आयुक्तालयात चार नवे एपीआय पदोन्नतीवर येणार आहेत.
अमरावती ग्रामीणमध्ये कार्यरत पीएसआय सचिन राठोड व अमोल तुळजेवार यांना सहायक पोलिस परिक्षेत्रात, उपनिरीक्षक राजश्री चंदापुरे व पीएसआय स्नेहल आडे यांची नागपूर शहर तसेच पीएसआय विणा पांडे यांची नवी मुंबई येथे पदोन्नतीवर सहायक पोलिस निरीक्षक म्हणून बदली देण्यात आली आहे.
याचवेळी अमरावती शहरात कार्यरत उपनिरीक्षक विजय गिते व विठ्ठल वाणी यांना अनुक्रमे नागपूर शहर व लोहमार्ग मुंबई येथे एपीआय म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे.
याचवेळी अमरावती आयुक्तालयात छत्रपती संभाजीनगर येथून दशरथ आडे, नाशिक शहरातून वर्षा डाळिंबकर, सोलापुरातून नितीन वसावे हे चार पीएसआय शिंदे व नंदुरबार येथून अमरसिंग पदोन्नतीवर एपीआय म्हणून येणार आहेत.