
“मंत्रालयात राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, मुंबई
दि. ७ आगस्ट रोजी मंत्रालयात राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी मा ना. श्री संजय सावकारे वस्त्र उद्योगमंत्री, श्रीमती अंशू सिन्हा प्रधान सचिव वस्त्र उद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मंचकावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मंत्रालयाच्या आवारात हस्तकलेची प्रदर्शनी देखील लावण्यात आली होती. सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते.
याकरिता महाराष्ट्रातून अनेक उद्योजक या ठिकाणी आले होते. या उद्योजकांना उद्योग विभागाच्या प्रधान सचिव यांनी मार्गदर्शन केले. त्याचसोबत ना. संजयजी सावकारे वस्त्र उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा उद्योजकांना मार्गदर्शन केले.





