
“माजी जि. प. सदस्य यांच्या हिंमतगड निवासात घरगुती गॅस सिलेंडरचा भडका”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
मानोरा ते मंगरुळपीर रोडवर सोमठाणा येथील रहिवाशी मुकुंद हिंमतराव पवार माजी जिल्हा परिषद सदस्य यांचे हिंमतगड या राहते घरात १७ आक्टोंबर ला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान किचनमध्ये स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस सिलिंडरचा भडका उडाला त्यामुळे घरातील सर्व मंडळी घ्या बाहेर आल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
परंतु घरातील साहीत्यामध्ये सोफा सेट, सोन्याची व चांदीचे दागिने, कपडे, भांडी, कपाट आदी मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या यात अंदाजे लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आगीमुळे घरातील साहित्य काही क्षणात जळुन खाक झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी मित्रमंडळी यांनी सहकार्य केले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आली होते तसेच पोलिस विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.





