♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत तणाव”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

अशोक राठोड, चंद्रपुर

 

चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत तणाव,आज मतदानाच्या दिवशी या निवडणुकीत मतदान केंद्र परिसरात दोन उमेदवारांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. तब्बल तेरा वर्षांनंतर चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेची निवडणुक होत आहे.

 

चंद्रपूर बँकेच्या एकूण २१ संचालक पदांपैकी १३ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत तर उर्वरित ८ जागांसाठी दि. १० रोजी मतदान घेण्यात आले. यात ओबीसी प्रवर्गासाठी, अनुसूचित जाती- जमातीसाठी आणि भटक्या विमुक्त गट या जागांचा समावेश होता. हाणामारीच्या घटनेपूर्वी उमेदवार सुभाष रघाताटे यांच्या समर्थकांनी मतदान केंद्राचे मुख्य दरवाजे आतून बंद करत केंद्र अडवण्याचा प्रयत्न केला, तर दुसरे उमेदवार दिनेश चोखारे यांच्या समर्थकांनी बाहेरून दरवाजे ठोठावत यावर जोरदार आक्षेप घेतला.

 

जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये १४ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत असून त्यासाठी शंभरहून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दरम्यान या हाणामारीच्या घटनेनंतर निवडणुक अधिकारी यांनी मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच मतदान केंद्र परिसरात कुणीही बाहेरच्या व्यक्तीने प्रवेश करू नये यासाठी स्वतः निवडणूक अधिकारी लक्ष ठेवून होते.

 

या गोंधळामुळे मतदान प्रक्रियेला अडथळा आल्याने उमेदवार दिनेश चोखारे यांनी संबंधित केंद्रावरील मतदान रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे प्रशासनाचीही तारांबळ उडाली. अ गटात एका मताची किंमत ५ लाख रुपये पर्यंत आहे. तर ब गट २ मध्ये एका मताची किंमत १५ ते २० हजार रुपये असल्याची चर्चा आहे.

 

मतमोजणी ११ जुलै रोजी चंद्रपूर शहरातील चांदा इंडस्ट्रियल इस्टेट येथे होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या समन्वयातून बँकेवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला आहे. तर भाजपकडून आमदार बंटी भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली मतदान केंद्रावर झालेल्या या गोंधळामुळे मतदान प्रक्रिया पारदर्शकतेत झाली नाही. आम्ही संबंधित केंद्रावरील मतदान रद्द करण्याची मागणी चंद्रपूर तालुका अ गटाचे उमेदवार दिनेश चोखारे यांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129