
“मा. प्रशांत राठोड कक्ष अधिकारी मुंबई यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण किनवट
सामाजिक बांधिलकीचा वसा अंगीकृत करून गोरगरिबांना सगळं सढळ हाताने मदत करणाऱ्या मा. प्रशांत पुरसिंग राठोड कक्ष अधिकारी मुंबई यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर त्यांना उदंड आयुष्यासाठी, नातेवाईक, मित्रपरिवाराकडुन अक्षरशः शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला, त्यांना भर-भरून शुभेच्छा दिल्या.
दिनांक १९ जुलै रोजी सकाळपासून त्यांच्या जन्म गावी पालाईगुडा येथे किनवट व माहुर तालुक्यातील मान्यवर, मित्र मंडळी, परिवारातील सदस्य, नातेवाईक, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते तसेच पत्रकार आणि च्याहत्यांनी त्यांना उदंड आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
माहूर आणि किनवट मध्ये जागोजागी प्रशांत राठोड यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आल्याचे दिसून आले. प्रशांत राठोड यांचे आगमन किनवट शहरात होताच त्यांनी शहरातील थोर महा पुरुषांच्या पुतळ्यांची पुष्प हार अर्पण करुन त्यांना मानवंदना दिली.
दुपारी २.०० वाजता किनवट येथील एन के गार्डन येथे सुद्धा प्रशांत राठोड यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. प्रशांत राठोड यांच्या एन के पार्क येथे प्रवेश करते वेळी बंजारा समाजाच्या महिला, बंजारा समाजाची वेशभूषा परिधान करून बंजारा समाजाचे पारंपारिक पद्धतीने प्रशांत राठोड यांचे स्वागत करण्यात आले.
एन के पार्क किनवट येथे मा. प्रशांत राठोड यांचा वाढदिवस साजरा करते वेळी त्यांना शुभेच्छा देणाऱ्या त्यांच्या चाहत्यांची संख्या हजारो मध्ये होती. त्यांच्या चाहत्यांमुळे प्रशांत राठोड यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम हा एक भव्य दिव्य सोहळ्याहमध्ये त्याचे रूपांतरण झाले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशांत भाऊ मित्र मंडळ परिवाराने अथक परिश्रम घेतले.