♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“गडचिरोलीत तंबाखूच्या अवैध कारखान्यावर पोलिसांची कारवाई”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

ज्ञानेश्वर चव्हाण, गडचिरोली

 

महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू उत्पादन, विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध घातला आहे. गडचिरोली जिल्ह्यातदेखील सुगंधित तंबाखूचे उत्पादन, विक्री व वाहतूक करण्यावर बंदी असतानाही सुगंधित तंबाखू तस्करी करणाऱ्यावर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत सुगंधित तंबाखूसह ७ लाख ८४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

मंगळवार (ता. २) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, १५ दिवसांपूर्वी मौजा डार्ली, ता. आरमोरी, जि. गडचिरोली येथील रेखाबाई सडमाके यांच्या राहते घरी आरोपी ओमप्रकाश गेडाम, रा. डार्ली, ता. आरमोरी, जि. गडचिरोली व इतर चार जणांनी मशिनच्या साहाय्याने सुगंधित तंबाखूचे उत्पादन करण्याकरिता अवैध कारखाना सुरू केला होता.

 

अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक डार्ली येथे रवाना झाले. गोपनीय माहितीमध्ये नमूद महिला रेखाबाई सडमाके (वय ४२) रा. डार्ली, ता. आरमोरी, जि. गडचिरोली हिच्या घरी पोहचले.

 

सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरून पोलिस पथकाने तिच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता त्या घरामध्ये सुगंधित तंबाखूने भरलेल्या टिनाच्या डब्यांचे विविध बॉक्स व सुगंधित तंबाखूचे उत्पादन करण्याकरिता आवश्यक असणारे साहित्य आढळून आले.

 

तेथून सुगंधित तंबाखू व साहित्य जप्त करण्यात आले. सुगंधित तंबाखू तयार करण्याकरिता लागणारे मशिन व इतर साहित्य असा एकूण ७, ८४, २०० रुपये किमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला.

 

याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांनी पोलिस स्टेशन आरमोरी येथे आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. ओमप्रकाश शंकर गेडाम याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच इतर चार आरोपी फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129