
“हिंगोली जिल्ह्यातील गोर बंजारा समाज बांधवांची बैठक अतिशय उत्साहात संपन्न”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
योगेश जाधव, हिंगोली
शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे हिंगोली जिल्ह्यातील गोर बंजारा समाज बांधवांची बैठक अतिशय उत्साहात संपन्न झाली. या बैठकीसाठी विविध तांड्यातून व शहरातील आपले समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंद की चादर, श्री. गुरु तेग बहाद्दूर ३५० वी शहीदी समागम निमित्य हजुर साहब नांदेड येथे बंजारा लाभना शीख शिकलकरी शिंदी मोहियाल या समाजाचा भव्य महामेळावा येत्या नोहेंबर महिन्यात संपन्न होणार आहे.
याच महामेळाव्याच्या प्रचार, प्रसारण व मार्गदर्शनानिमित्त बंजारा समाज भूषण रामेश्वर भाऊ नाईक (कक्ष प्रमुख मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व आपले धर्मगुरु रामराव महाराजांचे उत्तराधिकारी धर्मगुरू बाबुसिंग महाराज, धर्मगुरू सुनिल महाराज, धर्मगुरू कबीरदास महाराज, धर्मगुरु शेखर महाराज, धर्मगुरू जितेंद्र महाराज, धर्मनेता मा.किसन भाऊ राठोड मा.जगदीश भाऊ सकवान इत्यादी आपल्या जिल्ह्यातील गोर बंजारा समाज बांधवांना भेटण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी दि. ०७/०९/२०२५ रोजी येणार आहेत.
वरील सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली बंजारा लाभाना शिख शिकलकरी शिंदी मोहियाल समाजाचा महामेळावा संपन्न होणार आहे याच महामेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी आज सर्व समाज बांधवांनी एकत्र बसून नियोजन केले.