
“बसेस तथा अवजड वाहतुकीमुळे स्थानिक रहिवाशांचे अतोनात हाल”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, ठाणे
अंबरनाथ तालुका पूर्व भागामध्ये दिवसेंनदिवस अवजड चार चाकी वाहने,बसेस यांचा प्रवेश वाढत असून त्यामुळे स्थानिक रहिवाशांचे ,विद्दार्थी,वृद्ध आणि पादचार्यांचे अतोनात हाल होत असून या समस्येच्या पार्श्वभूमीवर वडवली विभागात अवजड वाहने व बसेस यांच्या प्रवेश बंदी घालणारे फलक (बोर्ड) लावण्याची मागणी सातत्याने संबंधित प्रशासना कडे करण्यात येत आहे.
या मागणी संदर्भात मा. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस साहेब, मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब, मा. परिवहन आयुक्त अधिकारी साहेब मुंबई, मा. जिल्हाधिकारी साहेब (ठाणे शहर), मा. पोलीस कमीशनर साहेब (ठाणे शहर) अशा विविध शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून, या मागणीसाठी दि.१०/०८/२०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता आमरण उपोशणाला बसण्याचा इशारा आशिष रामकृष्ण देशपांडे अंबरनाथ तालूका चिटणीस, राष्टवादी काॅंग्रेस पार्टी अंबरनाथ तालूका यांनी लेखी निवेदना द्वारे दिला होता.
आज दिनांक ०४/०८/२०२५ रोजी दुपारी १:३० वाजता वाहतूक शाखा ,उल्हास नगर येथील (A,C,P,) मा.श्री. विजय पोवार साहेब, मा.श्री. राजेश शिरोळकर साहेब यांच्या सोबत अंबरनाथ शहरातील वाहतुकी संदर्भात चर्चा झाली.
या चर्चे दरम्यान मा. विजय पोवार साहेबांनी माझ्या मागणीचा विचार करून येत्या दोन दिवसात अंबरनाथ नगरपरिषद मुख्याधिकारी साहेबांन सोबत बैठक घेऊन वडवली विभागात अवजड वाहने आणि बसेस यांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत मला आमंत्रित केले जाईल असेही विजय पोवार साहेबांनी स्पष्ट केले असून तरी देखील दिनांक १०/०८/२०२५ पर्यंत माझ्या या मागणीचा सकारात्मक निर्णय झाला नाही तर मी राष्टवादी काॅंग्रेस पार्टी अंबरनाथ तालूका चिटणीस या पदाच्या माध्यमातून पुढील तारखेची घोषणा करून निश्चितच आमरण उपोशनाला बसणार आहे याची नोंद संबंधित प्रशासनाने घ्यावी. असे कळविले होते.
दि. ०४/०८/२०२५ रोजी मा .श्री. विजय पोवार साहेब (ए,सी,पी,) यांच्या सोबत अंबरनाथ तालूका पूर्व भागातील वडवली विभागातील अवजड वाहने,बसेस तसेच प्रवेश बंदीचा बोर्ड लावण्याच्या विषया वर पुढील प्रमाणे चर्चा झाली.
१) स्मशानभूमी येथे वाहतूक पोलीस तैनात करणे
२) बेकायदेशीर वाहने जमा करणे
३) मा. मुख्याधिकारी साहेबांन सोबत चर्चा करून अवजड वाहने, बसेस, प्रवेश बंदीचा बोर्ड लावणे
४) अंबरनाथ तालूका पूर्व आणि पश्चिम दोन्ही विभागात कायदेशीर असणार्या रिक्षा युनियण साठी रिक्षा स्टॅंड देणे आदी विषयावर चर्चा झाली असता साहेबांनी अंबरनाथ पूर्व भागातील स्मशानभूमी येथून अवजड वाहनेतसेच बसेस यांना प्रवेश बंदी करण्याचे आदेश दिले.
आज दि. ०५/०८/२०२५ रोजी वाहतूक पोलीस इंचार्ज मा.बाळू पाटील ,वाहतूक पोलीस राजेश काठे यांनी अवजड वाहने,बसेस यांना प्रवेश बंदी केली. यामुळे वडवली विभागात वाहतूक कोंडी न झाल्याने अनेक वाहनधारक, प्रवासी नागरीक यांनी समाधान व्यक्त केले.
अशाच प्रकारची अंमलबजावणी कायमस्वरूपाची झाली पाहीजे अशी अपेक्षा आशिष देशपांडे यांच्या कडे नागरिकांनी व्यक्त केली. मुख्याधिकारी साहेब यांच्या सोबत चर्चा करून अंबरनाथ वडवली अवजड वाहने,बसेस,प्रवेश बंदी चा बोर्डा उपाय योजना केली जाईल असे सांगितले आहे.