
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, नांदेड
सध्या शोशल मिडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रत्येक गावातील ग्रामपंचायत नगरपंचायत शहरातील नगरपालिका किंवा महानगरपालिका या ठिकाणी गावांमध्ये किंवा शहरामध्ये रस्त्यावर गल्लीत चौका ठिक-ठिकाणी
बरेच मोकाट जनावरे नेहमी फिरत असतात. याच मोकाट जनावरांनी नांदेड येथील एका शाळकरी मुलीला मारून जखमी केल्याची हृदय हेलाऊन घेणारी घटना घडली.
या बेवारस मोकाट जनावरांचा बंदोबस्त स्थानिक प्रशासनाकडून होणे अतिशय आवश्यक आहे. अन्यथा आपल्या गावात, शहरात नांदेड सारखी घटना घडू शकते. आपण व्हिडिओ मध्ये ही घटना पाहू शकता. घटनेच्या ठिकाणी असलेल्या लोकांनी त्या जनावराला भीती दाखवून मारून त्या मोकाट जनावरांच्या तावडीतून सुटका केली. शेजाऱ्यांनी जर त्या जनावरास हाकलून लावले नसते तर त्या शाळकरी मुलीला आपले जीव सुध्दा गमवावे लागले असते. याकरिता पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत जाते वेळी स्वतःची काळजी घेण्याबाबतच्या योग्य ते सूचना द्याव्यात असे आवाहन महाराष्ट्र न्युज लाईव्ह मुंबई तर्फे करण्यात येत आहे.